मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून जळगाव शहरातून नूतन मराठा महाविद्यालयातील ९ विद्यार्थिनी व ३विद्यार्थी असे एकूण बारा युवा विज्ञान प्रस...
मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून जळगाव शहरातून नूतन मराठा महाविद्यालयातील ९ विद्यार्थिनी व ३विद्यार्थी असे एकूण बारा युवा विज्ञान प्रसारकांची निवड
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्यातर्फे 'शनिवारी विज्ञान वारी ' हा प्रकल्प राबवला जातो यात बारा युवा विज्ञान प्रसारकांना प्रशिक्षण देऊन त्यांना विज्ञान प्रयोग पेटी व विज्ञान प्रयोगाचे पुस्तक दिले जाते सदर विद्यार्थी वर्षभर शहरातील सहा शाळांमध्ये जाऊन महिन्यातून दोन शनिवारी शाळांमध्ये पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवतात त्यातून त्यांना विज्ञान हा विषय सहज व सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होते. त्यातून त्यांची संशोधन प्रवृत्ती वाढीस लागते यासाठी नूतन मराठा महाविद्यालयाचे सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर.बी .देशमुख , मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे सचिव प्रा. दिलीप भारंबे हे विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल .पी. देशमुख, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत भालचंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्य लाभते आहे. त्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी प पाटील मॅडम, प्रा. महेंद्र हायलिंगे, प्राध्यापक हिरे सर यांनी अभिनंदन केलेले आहे

No comments