जळगाव येथे आयोजित रान भाजी महोत्सव केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट प्रतिनिधी :खलील आर तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव ये...
जळगाव येथे आयोजित रान भाजी महोत्सव केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट
प्रतिनिधी :खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथे जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात आत्मा जळगाव, विज्ञान केंद्र, रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने (रानभाजी) महोत्सव चे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांकडून विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली जळगाव जिल्ह्यात मागील ५ वर्षापासून रान भाजी महोत्सव चे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील व जिल्ह्यातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्या चे महत्व ,त्यातील जीवनसत्वे, खनिजे, आणि औषधी, या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभाग, जळगाव आत्मा जळगाव, कृषी विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ,ऑफ वेस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात आले . तसेच या महोत्सवाचे रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पाक, कलाकृती, स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ यांच्या अर्थसाहयातून प्रवासी वाहन कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करण्यात आले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे ,यांच्यासह आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल तसेच आदिवासी विभाग अधिकारी उपस्थित होते

No comments