सोनवद येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा विकास पाटील धरणगाव (संपादक -:-हेमकांत गायकवाड) धरणगाव : तालुक्यातील सोनवद येथे जागत...
सोनवद येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील सोनवद येथे जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने सोनवद गावामध्ये गावातील आदिवासी बांधव व ग्रामस्थ बांधवांनी आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याच्या निमित्ताने बिरसा मुंडा तंट्या मामा भिल क्रांतिवीर खाजाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करताना धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री पवार साहेब भाजपाचे नेते सोनवद गावाचे लाडके माजी सरपंच निर्दोष भाऊ पवार पोलीस पाटील रवींद्र भोई ग्रामस्थ व आदिवासी बांधव यांनी मोठ्या उत्साहाने आदिवासी दिवस साजरा केला यानिमित्ताने श्री निर्दोष पवार यांनी भारत देशासाठीआदिवासी समाजातील अनेक क्रांतिकारी यांनी देशासाठी मोठे बलिदान दिले आहे त्यांची आठवण करून त्यांना नमन करण्यात आलेत अशाप्रकारे मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला व सर्व ग्रामस्थां व आजी-माजी पदाधिकारी यांच्या मार्फत आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या

No comments