वाघेरा गणामधील वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 9 ऑ...
वाघेरा गणामधील वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो. आदिवासी बांधवांची जीवनशैली व त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जल,जंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेम श्रद्धा निष्ठेने हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गणातील वेळुंजे येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन दाखवले. यावेळी वेळुंजे गावातून शोभयात्रा काढण्यात आली तारपा नृत्य,मोरगाव, नृत्य, कांबड नाच,संबळ, तुतारी वाद्यावर पारंपारिक नृत्य करत जल्लोष झाला जय आदिवासी जय जोहार घोषणांचा जयजयकर ऐकवयास मिळाला. यानंतर राघोजी भांगरे चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर समाधान भाऊ बोडके, रुपांजली माळेकर,भास्कर भाऊ खोसकर वाघेरा गणातील सरपंच अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती.
क्रांतीविरांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत राघोजी भांगरे चौक येथे घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकरांच्या बलिदानाचे मोल आपल्या विचाराद्वारे उपस्थितांसमोर मांडले. वाघेरा गणातील कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे आमदार हिरामण दादा खोसकर कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती विनायक माळेकर मा. जि. प.परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले आयोजक वाघेरा गण पैकी वेळुंजे आदिवासी बांधव महिला उपस्थित होत्या.


No comments