निराधारांना आपुलकी चार आधार ... रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या भेटीने श्रावणबाळ लाभार्थिनींचे डोळे पाणावले! रावेर प्रतिनिधी मुबारक तडव...
निराधारांना आपुलकी चार आधार ...
रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या भेटीने श्रावणबाळ लाभार्थिनींचे डोळे पाणावले!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासकीय काम म्हणजे कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत फेर्याच मारणे हे सर्वसामान्यांचं समजणं. पण काही अधिकारी आपल्या आपुलकीने व माणूसकीच्या वृत्ती आणि कार्यकर्तुत्वामुळे हे समज उद्ध्वस्त करतात. याचंच जीवंत उदाहरण रावेर तहसीलदार बंडू कापसेसाहेब ठरले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या तसेच महसूल प्रशासनातर्फे महसूल दिन सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यात सुरू असलेल्या विविध लाभार्थी समाधान शिबिरां दरम्यान, रावेर तहसील चे कार्यतत्पर कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष मनमिळाऊ तहसीलदार बंडू कापसे यांनी ७० वर्षीय दिव्यांग सिंधूबाई ज्ञानदेव चौधरी (रा. रोझोदे, ता. रावेर) यांच्या घरी थेट जाऊन भेट दिली. श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थिनी असलेल्या सिंधूबाईंना डीबीटी (DBT) पद्धतीने थेट बँक खात्यात लाभ मिळावा यासाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या ई-केवायसीची प्रक्रिया देखील त्यांनी घरच्याघरी पूर्ण केली.
पायाला चक्री लावून तालुकाभर फिरत असलेले तहसीलदार बंडू कापसे केवळ लाभ वाटप करत नाहीत, तर माणुसकीची ऊब देत आहेत. सिंधूबाईंसारख्या अनेक वयोवृद्ध नागरिकांच्या घरी पोहोचून ते केवळ सरकारी योजना नोंदवित नाहीत, तर त्यांच्या जीवनातील अडचणी, गरजा समजून घेत आहेत.
सिंधूबाई म्हणाल्या, "अहो, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तहसीलदारसाहेब आमच्या दारात येतील. त्यांनी विचारपूस केली, एवढं प्रेम दिलं... डोळ्यांत पाणी आलं!"
रावेर तालुक्यातील अनेक वयोवृद्ध, दिव्यांग लाभार्थ्यांना आता 'प्रशासन दारी, माणुसकीशी नातं जपणारे अधिकारी' असा अनुभव येतोय. बंडू कापसे यांच्या या आपुलकीच्या कार्यामुळे तालुक्यात त्यांचं नाव कौतुकाने घेतलं जातंय.तहसीलदार फक्त प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर रावेर तालुक्यातील हजारो वयोवृद्धसाठी श्रावणबाळ सारखे खरे आधारवड ठरत आहेत!

No comments