नूतन मराठा महाविद्यालयात डिजिटायझेशनच्या कामकाजास प्रारंभ भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दि 4 ऑगस्ट 2025 रोजी ...
नूतन मराठा महाविद्यालयात डिजिटायझेशनच्या कामकाजास प्रारंभ
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि 4 ऑगस्ट 2025 रोजी हेरिटेज फाउंडेशन पुणे व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रंथालय विभागातील पुस्तकांचे डिजिटायझेशन कामकाजाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी हेरिटेज फाउंडेशनचे प्रमुख मा.श्री. भुजंगराव बोबडे, श्री करण माने, श्री हर्षल बऱ्हाटे, कु. भाग्यश्री सोनार यांनी कामकाजास प्रारंभ केला. सुरुवातीस 15000 पुस्तकांचे डिजिटायझेशन होणार आहे. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये 125000 पेक्षा जास्त पुस्तके असून यामध्ये धार्मिक ऐतिहासिक दुर्मिळ सर्व विषयांचे पुस्तकांचे जतन केलेले आहे. हेरिटेज फाउंडेशन या संस्थेमार्फत भारतामध्ये आतापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त दुर्मिळ ग्रंथांचे हस्तलिखितांचे डिजिटायझेशनचे कामकाज केलेले आहे. या संस्थेचा भारतीय ज्ञान परंपरा जतन व संवर्धन करण्याचा प्रमुख उद्देश असून यामध्ये आमचे महाविद्यालयहि सहभागी झाले आहे. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के बी पाटील,डॉ. एन जे पाटील, प्रा. अरबी देशमुख, डॉ. हेमंत येवले,श्री अविनाश पाटील, श्री. अरविंद भोईटे व ग्रंथालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments