चक्क बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलची रूम केली बुक...येवले रूममध्ये घेत होता ऑनलाईन क्रिकेट व मार्केट सट्टेबाजी.. स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ...
चक्क बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलची रूम केली बुक...येवले रूममध्ये घेत होता ऑनलाईन क्रिकेट व मार्केट सट्टेबाजी.. स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
![]() |
| काल्पनिक फाईल चित्र |
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.५):-अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीच्या रूम मध्ये ऑनलाइन क्रिकेट आणि शेअर मार्केट सट्टेबाजीचा डाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे.मधुकर सखाराम येवले (रा.मुलुंड कॉलनी मुंबई) आणि त्याच्या अज्ञात साथीदारांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बिरप्पा करमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मधुकर येवले यांनी आधार कार्ड बनावट दाखवून हॉटेलमधील रूम बुक केला होता.पोलिसांच्या छाप्यात बुकिंग ची नावे आयडी पासवर्ड मोबाईल कॅल्क्युलेटर इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ हे करीत आहेत.

No comments