adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गरजू विधवा महिलांना आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण देण्याचे प्रयत्न - वासुसेठ छाबरिया अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनतर्फे विधवा महिलांना आर्थिक मदत

 गरजू विधवा महिलांना आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण देण्याचे प्रयत्न - वासुसेठ छाबरिया  अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्...

 गरजू विधवा महिलांना आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण देण्याचे प्रयत्न - वासुसेठ छाबरिया 

अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनतर्फे विधवा महिलांना आर्थिक मदत 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आजचा हा क्षण खूपच महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे. कारण, समाजातील गरजू विधवा महिलांना आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण देण्याचा आपला हा प्रयत्न आहे.

आपल्या समाजात अनेक महिला अशा आहेत की ज्या नियतीच्या झटक्यामुळे पती गमावतात, आणि त्यानंतर त्यांचे जीवन अधिकच कठीण होते. केवळ भावनिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही. अशा परिस्थितीत एक हात मदतीचा पुढे करणं हे आपल्या समाजाचं कर्तव्य आहे, आणि आज अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम फाउंडेशन ते पार पाडत आहोत असे प्रतिपादन डी.आर. इन्फ्रास्ट्रकचरचे चेअरमन वासुसेठ छाबरिया यांनी केले.

अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन च्यावतीने नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात शहरातील विधवा महिलांना आर्थिक मदत वितरित करण्यात आली. यावेळी डी. आर. इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन वासुसेठ छाबरिया, मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सईद शेख, सचिव मुबीन तांबटकर, संचालक इंजि. इकबाल सैय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मदतकार्याबद्दल फाउंडेशनचे संस्थापक हाजी नजीर शेख, कादिर सर, हाजी मिर्झा, सिटी लॉनचे परवेज अहमद, सलीम शेख, हाजी गुलाम आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

मदत लाभलेल्या महिलांनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल भरभरून समाधान व्यक्त केले. फाउंडेशनच्या नियमित आर्थिक सहकार्यामुळे आमचं जीवन सुसह्य होत आहे.आणि जिवनातले काही क्षण सुगीचे वाटतात असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक करताना डॉ.सईद म्हणाले की, तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि डोळ्यातली आशा  हेच आमच्या कामाचे खरं यश आहे. समाजातील कोणताही दुर्बल वर्ग मागे राहू नये, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरावरही मोठे कौतुक होत आहे.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -  9561174111

No comments