वृक्ष संवर्धन झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश जळगाव प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड मानव सेवा मंडळ , जळगाव संचलि...
वृक्ष संवर्धन झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जळगाव प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
मानव सेवा मंडळ , जळगाव संचलित प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे वृक्षबंधन हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम घेण्यात आला.
इको क्लब उपक्रम अंतर्गत इको क्लब समन्वय , उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पर्यावरणपूर्वक संदेश देणारी राखी बनवून दाखवली त्यानंतर विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन आणि पर्यावरण पूरक सण साजरा करण्याचा संदेश देऊन उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवी चे विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
शाळेच्या मुख्याध्यापिका , इको क्लब अध्यक्ष माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , कडुलिंब सारख्या वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन कसे करावे यांच्या संकल्प करण्यास सांगितली तसेच हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मूल्यवान आहे हे पण सांगितले तसेच प्लास्टिक मुक्त अभियान विषयी विद्यार्थ्यांना महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी धान्य , जुन्या कापडे,कागद ,दोरा , मणी ,डायमंड इत्यादी साहित्य,टाकाऊ वस्तु पासून पर्यावरणपूर्वक राख्या तयार करण्यात आल्या.
राख्यांवर पर्यावरण पूरक संदेश जसे की , झाडे लावा , झाडे जगवा .निसर्गाचे रक्षण करा .पर्यावरण संवर्धन करा. देशी वृक्षांचे जतन करा असे संदेश लिहिण्यात आल्या होत्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील , इको क्लब समन्वय शिक्षक सुनिल दाभाडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
पर्यावरण पूरक संदेश राखी बांधून वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन वृक्ष संवर्धन साजरा केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस.डाकलिया ,मानस सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.



No comments