बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो - प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विश्वातील सर्वात सु...
बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो - प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विश्वातील सर्वात सुंदर, शांतता व समृद्धीचे प्रतीक आणि आपल्या साऱ्यांचा हृदयमणी असलेल्या भारत देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने प्रत्येक भारतीयाने देशाला बलशाली भारत करू असा प्रण करून देशासाठी समर्पित होऊया असे आवाहन प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी मा लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर वाय चौधरी, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, तीनही शाखांचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वतः सहित, परिसर, शाळा व महाविद्यालयाला तंबाखूमुक्त ठेवण्याची शपथ यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी सर्व उपस्थितांना दिली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या यश युवराज कोळी या कॅडेटचा *द बेस्ट कॅडेट* म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात राष्ट्रभक्तीपर गीते, नृत्य व भाषने करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची ज्योत जागवली. याप्रसंगी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ डी एल सूर्यवंशी, संतोष तायडे, शेखर महाजन, अमित गारसे, प्रमोद अजलसोंडे यांनी परिश्रम घेतले.

No comments