सदैव कर्तव्यदक्ष राहणारे “दबंग ठाणेदार” म्हणून ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांचा वाढदिवस साजरा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-...
सदैव कर्तव्यदक्ष राहणारे “दबंग ठाणेदार” म्हणून ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांचा वाढदिवस साजरा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर (जि. बुलढाणा) – मलकापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर कठोर अंमलबजावणी करताना सदैव कर्तव्यदक्ष राहणारे “दबंग ठाणेदार” म्हणून ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे बुलढाणा उपजिल्हाप्रमुख अजय टप, काँग्रेस किसान जिल्हाध्यक्ष संभाजीराव शिर्के तसेच प्रहार पक्षाचे शहर उपप्रमुख बलराम बावस्कर यांनी गिरी साहेबांना वात्सल्य रूप गाय-वासरू प्रतिमा भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. गिरी साहेबांच्या कार्यकुशलतेमुळे गुन्हेगारीवर आळा बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वाढदिवसानिमित्त दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय संदेश देण्यात आला.

No comments