adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न

 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “देणाऱ्याने देत...

 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे” या उक्तीप्रमाणे आणि रोटरीचे घोषवाक्य Service Above Self सर्व्हिस अबाऊ सेल्फ यानुसार रोटरी क्लबच्या सदस्यांनी दातृत्वाचे सुंदर उदाहरण घडवले. कार्यक्रमासाठी रो.मनोज चंगेडिया गहू गोणी ५, तेल डबा १, मुलींसाठी कॉस्मेटिक्स, मेंहदी कोन व इतर साहित्य, रो.निवृत्ती झिने खाऊ साहित्य, रो. विनोद बोरा सफरचंद पेटी, रो.राजेश परदेशी राख्या, रो. हरीश पेमदाणी एक तेल डब्याचे योगदान दिले. सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपली सेवा दिली. यावेळी पीडीजी रो. शिरीष रायते सर, रो. ईश्वर बोरा, रो. विनोद बोरा, रो.निवृत्ती झिने, रो. मनोज चंगेडिया, रो. राजेश परदेशी, रो. संजय मुनोत, रो. अजय गांधी, रो. विजय जुंदरे, रो. अमृत कटारिया, रो. नरेंद्र चोरडिया, रो. सुजाता कटारिया, रो. मनीष बोरा, अँन्स नीलम परदेशी, साजरी परदेशी,रिमांड होम संस्थेचे

सचिव फातिमा मॅडम सर्व शिक्षक व मदतनीस विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलताना रो.सुनील कटारिया यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या  शुभेच्छा दिल्या.व म्हणाले की,हा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्याचा नाही,तर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या वचनाचा उत्सव आहे. राखी ही फक्त दोऱ्याची गाठ नसून, मनांना जोडणारी भावनिक नाळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षणाला प्राधान्य द्या, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.जशी राखी जबाबदारीची जाणीव करून देते, तशीच तुम्हीही समाजात आपले स्थान निर्माण करा. रोटरी क्लब नेहमीच तुमच्या पाठीशी आहे.असे सांगितले. मनोगत व्यक्त करतांना पीडीजी रो. शिरीष रायते सर म्हणाले की हा उपक्रम गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रोटरी सेंट्रल सातत्याने राबवत आहे. फातिमा मॅडम यांनी रिमांड होम संस्थेच्या वतीने रोटरी क्लबच्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रो.ईश्वर बोरा यांनी सर्वांचे आभार मानले.


 वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments