पोलीस पाटील चारुलता देवराज यांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानपत्र मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा (संपादक -:- हेमकांत गा...
पोलीस पाटील चारुलता देवराज यांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानपत्र
मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी तालुका चोपडा. तालुक्यातील गलंगी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील चारुलता सुनील देवराज यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावरे व चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते प्रस्तुती पत्र देऊन गौरवण्यात आले त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो लेडीज असून सुद्धा आपलं कर्तव्य रात्र असो किंवा दिवस केव्हाही मदत साठी तयार असतात.
गलंगी गावात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलिसांच्या मदतीला धावून जातात. आणि नेहमीच सहकार्याची भावना आपल्या मनात असतात त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यांना पुढील वाटचालीसाठी गलंगी व अनेर परिसरातील सर्व स्तरावरून अभिनंदन च्या वर्षाव करण्यात येत आहे.

No comments