adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अतिदुर्गम भागात लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम !

 अतिदुर्गम भागात लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम !  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम ...

 अतिदुर्गम भागात लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम ! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी भागातील उपकेंद्र मोहमांडली तालुका रावेर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा, मोहमांडली नवी येथे आरोग्य विभागातर्फे लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांच्या आदेशानुसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व, फायदे व योग्य पद्धत यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या उपक्रमामध्ये CHO डॉ. रमीज सय्यद, डॉ. गिरीश पाटील, ANM वैशाली तळेले, आरोग्य सेवक सलीम तडवी, मुबारक तडवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळेचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर, शिक्षक विनोद पाचपोळे, ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी आरोग्य सहाय्यक सूर्यवंशी साहेब यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

No comments