यावल येथून जवळच असलेल्या सातोद कोळवद रस्त्यावर बिबट्याचे दर्शन काल्पनिक फाईल चित्र भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...
यावल येथून जवळच असलेल्या सातोद कोळवद रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथून जवळच असलेल्या सातोद - कोळवद रस्त्यावर नाल्यालगत बिबट्यांचा वावर झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले. याबाबत नागरिकांनी यावल रावेर मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अमोल जावळे यांचे अत्यंत जवळीक व विश्वासू असलेले वेंकटेश बारी यांच्याशी संपर्क साधला
यावेळेस व्यंकटेश बारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यावल पूर्व यांच्याशी रात्रीच संपर्क साधला साहेबांनी त्वरित डोंगर कोठारा येथील वन परिमंडळ आय एस तडवी आगार रक्षक बीबी गायकवाड बस्ती पथका चे इंदल चव्हाण यांना लगेचच घटना ठिकाणी पाठविले व सदरील पथकाने त्या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील बिबट्या पथकाला दिसला नसून सदरील बिबट्याचा शोध सुरू आहे तरी नागरिकांनी याबाबत अफवावर विश्वास ठेवू नये. याबाबत भारतीय जनता पार्टीचे वेंकटेश बारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
No comments