वडगाव गुप्ता शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा 120 किलो गांजा हस्तगत सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि....
वडगाव गुप्ता शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा 120 किलो गांजा हस्तगत
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३०):-ओडीसा राज्यातुन विक्रीकरता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाच्या गांजासह एकुण 80 लाख 83,464/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.दि.29 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री.किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार त्याचे कडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली. पोनि.श्री.कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन पथकास अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी.जाणारे रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनारा जवळ सापळा रचुन थांबले असता बातमीतील ट्रक येतांना दिसल्याने सदर ट्रक चालकास त्याचे ताब्यातील ट्रक रोडचे कडेला थांबविण्यास सांगुन ट्रकमधील दोन्ही इसमांना अटकावुन ठेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे नवनाथ अंबादास मेटे वय 38 वर्षे,रा.ढोरजे,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर,ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वय 31 वर्षे,रा. मळेगांव,ता.शेवगांव,जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे ताब्यातील ट्रकची पंच,फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबीन वरील टपावर 6 गोण्यामध्ये 30,22,625/- रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकुण 80,83,464/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे सखोल चौकशी करता त्यांनी सदरचा गांजा हा त्यांचे साथीदार 3) (XXX) 4) (XXX) यांचा असुन तो विक्रीकरीता आणला असल्याचे सांगितले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुध्द पोकॉ/2520 प्रकाश नवनाथ मांडगे नेम स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे गु.र.नं. 650/2025 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींचे ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा मिळुन आलेला असुन सदर गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि/अनंत सालगुडे नेम स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे,राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे,संतोष खैरे,दिपक घाटकर,फुरकान शेख,लक्ष्मण खोकले,राहुल द्वारके,अमृत आढाव,आकाश काळे, रमिझराजा आतार,प्रकाश मांडगे,सागर ससाणे,भगवान धुळे,उमाकांत गावडे,अरुण मोरे, जयराम जंगले शाखेचे यांनी केलेली आहे.
No comments