adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भंडारा,नागपूर जिल्ह्यात प्रयत्नशील राहणारे डॉ. योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी वाशिम जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला..!!

 भंडारा,नागपूर जिल्ह्यात प्रयत्नशील राहणारे डॉ. योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी वाशिम जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला..!!   सौ. संगीता...

 भंडारा,नागपूर जिल्ह्यात प्रयत्नशील राहणारे डॉ. योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी वाशिम जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला..!!  


सौ. संगीता इनकर मॅडम ( वाशिम जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शासकीय कारणास्तंव वाशिम च्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस‌. मॅडम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ .योगेश कुंभेजकर यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. योगेश कुंभेजकर सध्या महाबीजचे व्यवस्थापकीय  संचालक असून याआधी ते भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि नागपूरचे सीईओ म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिले होते. आता नव्याने वाशिम जिल्हाधिकारी म्हणून कुंभेजकरांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी अप्पर  जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी त्यांचे स्वागत केले.

श्रीमती बुवनेश्वरी एस. यांची राज्य शासनांने अकोला येथे महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी वाशिम जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश कुंभेजकर यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने २० ऑगस्ट रोजी जारी केले होते.

नुतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश कुंभेजकर हे २०१६ बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कामकाज पाहिले आहे. वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी ते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

No comments