गावठी बंदुकीचा धाक दाखवून दीड लाख लूटले! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील सावदा शहराजवळ भरदिवसा...
गावठी बंदुकीचा धाक दाखवून दीड लाख लूटले!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा शहराजवळ भरदिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दीड लाख रूपयांची लूट करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सावदा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे असून या प्रकरणी बऱ्हाणपूरचा कुख्यात गुंड अज्जू डॉन आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ येथील साजीद शेख अकबर हे मित्र बबलू खान अय्यूब खान हे दोन्ही दिनांक २७ऑगष्ट च्या सायंकाळ साडे चार वाजेच्या दरम्यान दुचाकी ने टायरांचे दीड लाखांची रोकड घेऊन द सावदावरुन भुसावळ कडे जातांना
सावदा शहरापासून काही अंतरावर पिंपरुड रस्त्यावरील स्मशानभूमी पुढे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारमधून अज्जू डॉन बऱ्हाणपूरवाला, तौसीफ (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह तीन अनोळखी साथीदारांसमवेत आले व
यातील अज्जू डॉन याने त्यांची स्कूटी अडवून गावठी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत दीड लाख रूपये घेऊन पलायन केले. या प्रकरणी साजीद शेख अकबर यांनी सावदा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून अज्जू डॉन बऱ्हाणपूरवाला, तौसीफ (पूर्ण नाव माहित नाही) आणि तीन अनोळखी तरूण यांच्या विरोधात गुरन 211/2025, भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम-
310(2),311,115 (2), 351(2) (3), 352, सह शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 या कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, उपनिरिक्षक अमोल गर्जे आणि राहूल सानप हे करीत आहेत.

No comments