मोटार वाहन (RTO) विभागाचे अंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’ 'मागे एकदा, मी ‘मोटार वाहन विभागाचे अंमलबजावणी ...
मोटार वाहन (RTO) विभागाचे अंमलबजावणी अधिकारी ?
छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’
'मागे एकदा, मी ‘मोटार वाहन विभागाचे अंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’ नावाची पोस्ट लिहिली होती. ती कितपत व्हायरल झाली याची माहिती नाही मात्र विभागातील अधिकाऱ्यांच्या ‘नोबेल वर्क’ ची बऱ्याच जणांना माहिती झाली.
रस्त्यावर मोटार वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्या अपघातात गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींशी ज्या विभागांचा प्रत्यक्ष संबंध असतो किंवा येतो ते विभाग अश्याप्रसंगी माणुसकी किंवा मानवता धर्माचे पालन अभावानेच पालन करताना आढळून येतात. त्यांच्यादृष्टीने त्यांचे कर्तव्य हे तांत्रिक बाब असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.
परंतु, मोटार वाहन विभाग (RTO) हा एकमेव असा विभाग आहे, ज्याचा अपघातातील फक्त अपघातग्रस्त वाहनाच्या यांत्रिक तपासणी पुरता असलेला संबंध विसरून विभागातील अधिकारी केवळ 'मानवता धर्म' व माणुसकीस जागून आपल्या कक्षेबाहेरील काम करत जखमी व्यक्तींना मदत करतात, त्यांचे प्राण वाचण्यास महत्त्वाची भुमिका पार पाडतात.
अश्यावेळी स्वतःची पदरमोड करून, खिश्यास तोशीस लागली तरी ते मागेपुढे पाहात नाहीत. याचे प्रत्यय प्रत्येक्षात बघावयास मिळाले, सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीरामपूर - बाभळेश्वर रस्त्यावर श्रीरामपूर पासून ७ ते ८ किमी अंतरावर दुपारी जवळपास पावणे बारा ते बारा वाजण्याच्या दरम्यान वाहनांचा अपघात घडला होता. अपघातग्रस्त वाहनांतील तीन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्यापैकी दोन जणांना अतिरक्तस्त्राव होत होता. त्यांच्या जीवन - मरणाचा प्रश्न होता. रस्त्यावर अंमलबजावणी कामावर निघालेल्या मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नजरेस त्या अपघातग्रस्त व्यक्ती पडल्या. मात्र इंटरसेप्टर वाहनांत बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अडचण येत होती. परंतु, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दुसरे वाहन थांबवून त्यात ताडपत्री अंथरून सदरील अपघातग्रस्त तीन्ही जखमींना नजीकच्या प्रवरा रुग्णालयात तातडीने दाखल केले.
सामान्यतः स्रिया या स्स्वभावाने मृदु व संवेदनशील असल्याने कित्येक जणींना जखम, रक्तस्त्राव पाहून भोवळ येते.
परंतु, आरटीओ विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक कु.निकीता पानसरे
या भगिनी अधिकारी यांनी धीरेदात्तपणे जखमींना उचलण्यास मागेपुढे पाहिले नाही. हे करीत असताना त्यांच्या हाताला व गणवेशास लागलेल्या जखमी व्यक्तींच्या रक्ताच्या डागांची देखील त्यांनी पर्वा केली नाही.
यासोबतच बरोबर असलेले मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील यांना काही कारणास्तव अंमलबजावणी पथकात काम करण्यास मागील सहा महिन्यांपासून मज्जाव करण्यात आला होता. परंतु,अंमलबजावणी पथकात काम करण्याची संधी प्राप्त होताच यंत्रवत, भावनाशून्य व केवळ कर्तव्यभावनेने काम करण्यापेक्षा आपल्या अंगी असलेल्या माणुसकीच्या वृत्तीचे अपघातग्रस्तांना संकटसमयी मदतीतून त्यांनी माणूसकीचे दर्शन घडवले.
मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक निकीता पानसरे,सागर आढाव यांच्या चांगल्या कामाची नक्कीच नोंद होईल.आपल्या पुण्यकर्माच्या गाठोड्याचे वजन नक्कीच वाढेल यात शंका नाही.
रूक्मिणीकांत कळमणकर
मोटार वाहन निरीक्षक (सेवानिवृत्त)
संकलन:
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111



No comments