adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू..राज्य शासनाने नियुक्त केलेल्या डीपी युनिटने केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध..सुधारणा किंवा त्रुटी असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

  अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू..राज्य शासनाने नियुक्त केलेल्या डीपी युनिटने केलेला विद्यमान ज...

 अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू..राज्य शासनाने नियुक्त केलेल्या डीपी युनिटने केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध..सुधारणा किंवा त्रुटी असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२१):-अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राचा सुधारीत विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या नगररचना विभागाच्या पथकाने (डीपी युनिट) मूळ हद्द व वाढीव हद्दीचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला असून हा नकाशा नागरिकांना पाहण्याकरिता महानगरपलिका व विकास योजना विशेष घटक कार्यालयात,कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच सदर नकाशा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. याबाबत महानगरपालिकेने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून,विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये काही सुधारणा किंवा त्रुटी असल्याबाबत, नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यास प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करताना योग्य ती दखल घेण्यात येईल.त्यासाठी, नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तीनी कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१(१) अन्वये अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राच्या मूळ हद्दीची विकास योजना अधिसूचना ४ जुलै २००५ अन्वये मंजूर आहे. तर, वाढीव हद्दीची विकास योजना अधिसूचना ४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर आहे. या विकास योजना सुधारित करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम चे कलम २३(१) अन्वये सर्वसाधारण सभेचा ठराव करून ७ मार्च २०२४ रोजी इरादा जाहीर केलेला आहे.राज्य शासनाने नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या नगररचना विभागाचे पथक (डीपी युनिट) नियुक्त केले आहे. त्यांनी तयार केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा व अहवाल, नगर रचना अधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आला आहे. हा नकाशा नागरिकांना पाहण्याकरिता महानगरपलिका व विकास योजना विशेष घटक कार्यालयात, कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तसेच सदर नकाशा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये काही सुधारणा किंवा त्रुटी असल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यास प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करताना योग्य ती दखल घेण्यात येईल. त्यासाठी, नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तीनी कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभारी उपसंचालक तथा नगररचना अधिकारी पूनम पंडित व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. सदर नकाशा हा विकास योजना विशेष घटक, सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, तहसील कार्यालय समोर, अहिल्यानगर येथे व अहिल्यानगर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

No comments