शिरपूर शहरात संत शिरोमणी श्रीसंत सेनाजी महाराज यांचा फलक अनावरण सोहळा भव्य उत्साहात संपन्न शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गा...
शिरपूर शहरात संत शिरोमणी श्रीसंत सेनाजी महाराज यांचा फलक अनावरण सोहळा भव्य उत्साहात संपन्न
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य फलक अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. शहरातील करवंद नाका येथे 'जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.या अनावरण सोहळ्याचे उद्घाटन शिरपूर विधानसभेचे आमदार मा. श्री. काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष मा. दादासो देवेंद्रजी पाटील, व लौकी गावाचे माजी सरपंच मा. भिमसिंग जिभाऊ राजपूत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमास नाभिक समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर यांची उपस्थिती कार्यक्रमाची शान वाढवणारी ठरली.उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुखतः जगदिश दादा सोनगडे अध्यक्ष, धुळे जिल्हा हितवर्धक संस्था दिलीपजी येशी – अध्यक्ष, कर्मचारी संघटना, धुळे जिल्हा रविंद्रजी खोंडे सर, उपाध्यक्षनानासो गोकुळजी येशी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय जनसेवा पक्ष,सौ. हेमलता येशी जिल्हा महिला अध्यक्षा,सौ. पल्लवीताई शिरसाठ उपाध्यक्षा,सी. के. महाले सर, प्रकाश जगताप,पदमाकर शिरसाठ, रावसाहेब,सुधाकर वारुळे, गोपाल वरसाळे, संजय वरसाळे, जितेंद्र सनेर सर, गोपाल सैंदाणे सर, रविंद्र नामदेव अहिरे, जयप्रकाश महाले, रविंद्र सोनगिरे सर, प्रताप सोनवणे सर, जगन्नाथ येशी, प्रमोद भोंगे महाराज, सतिषजी भोंगे महाराज, कवी यशवंत निकवाडे सर, सुरेश चौधरी, दिनेश, पप्पू राजपूत विजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रामविकास अर्थात श्रीरामचंद्र येशी उपाध्यक्ष, विकास सेन अध्यक्ष जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली
टिप👉🏿 संत शिरोमणी सेना महाराज यांचे फलक जनकल्याण सेवभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांनी स्वखर्चाने तयार करून बसवण्यात आले तालूक्यातील व शहरातील सर्वच नाभिक समाज बांधवांनी. त्यांचे कौतूक करण्यात आले.

No comments