adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी येथील कै.प्रा.भास्करराव महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने जळगाव येथील वृद्धाश्रमात मिष्ठांन्न भोजन

  साकळी येथील कै.प्रा.भास्करराव महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने जळगाव येथील वृद्धाश्रमात मिष्ठांन्न भोजन  भरत कोळी यावल ता.प्र. (स...

 साकळी येथील कै.प्रा.भास्करराव महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने जळगाव येथील वृद्धाश्रमात मिष्ठांन्न भोजन 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावलः  तालुक्यातील साकळी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक,पुस्तकप्रेमी व एक बहुआयामी व्यक्तिमत्व कै.प्रा.भास्करराव रामजी महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.यात गावातील मातंग समाजातील कष्टकरी महिलांना साड्या व पातळे,फराळ वाटप करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके देण्यात आली.त्याचप्रमाणे जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री आनंदाश्रमात वृद्ध नागरिकांना मिष्ठांन्न भोजन दिले.हे या दिवसाचे विशेष असे सामाजिक कार्य महाजन परिवाराच्या हातून घडले.एकूणच महाजन कुटुंबीयांकडून आपले वडील कै.भास्करदादांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्ताने अन्नदान,वस्त्रदान,पुस्तकदान असे तिहेरी श्रेष्ठदान करण्याचे पुण्यकर्म या कुटुंबाला लाभले आहे. दिवसभराच्या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी कै.भास्करराव महाजन यांचे ज्येष्ठ सुपुत्र तसेच शारदा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि श्रीसंत सावता महाराज बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष नाना महाजन त्यांच्या पत्नी सौ.रजनी महाजन यांचे सह समस्त परिवार उपस्थित होते. वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा अविरत सुरू राहण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम समस्त महाजन परिवाराकडून भविष्यातही योजले जाणार आहे.असे या परिवाराकडून सांगण्यात आले.

No comments