करंज सजेचे ग्राम महसूल अधिकारी श्री अजय बिडवे यांचा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार ज...
करंज सजेचे ग्राम महसूल अधिकारी श्री अजय बिडवे यांचा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार
जळगाव प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
79 व्या स्वातंत्र्यदिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध विभागातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जळगावचे आमदार श्री राजू मामा भोळे तसेच,जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सीईओ श्रीमती मीनल करणवाल यांच्या हस्ते,सत्कार करण्यात आलेला होता यामध्ये,महाराष्ट्र शासन महसूल विभागातर्फे शेत सुलभ योजनेअंतर्गत उत्कृष्ट व शेतकरी हितासाठी कार्य करणाऱ्या करंज सजेचे ग्राम महसूल अधिकारी श्री अजय धनराज बिडवे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, बऱ्याच वर्षापासून इतर हक्कात असलेला "तुकडा"शेरा कमी करून करंज व किनोद सजेतील एकूण नऊ गावांच्या 358 शेतकऱ्यांना तुकडा शेरा कमी करून दिलासा मिळालेला आहे, तसेच ग्राम महसूल अधिकारी अजय बिडवे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रमांतर्गत असलेल्या, जिवंत ७/१२ या मोहिमेअंतर्गत देखील मयत खातेदार शोधून वारसाच्या नोंदी नोंदवून सातबारा वाटप कार्यक्रम राबविलेला आहे, यांनी करंज व कीनोद सजेची महसूल वर्ष संपायच्या अगोदर 100% वसुली देखील केलेली आहे, अशा विविध उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याची दखल घेत, 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिनी देखील जळगाव उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी व जळगावचे तहसीलदार श्रीमती शीतल राजपूत यांनी देखील उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी म्हणून श्री अजय बिडवे यांचा सन्मानपत्रक देऊन सत्कार केलेला आहे, याप्रसंगी किनोद व करंज सजेत येणाऱ्या 9 गावांच्या सरपंच व इतर पदाधिकारी यांनी श्री अजय बिडवे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे

No comments