रक्षाबंधन निमित्त ‘खाकी हीच राखी’चा अनोखा संदेश अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रक्षाबंधन सण हा केवळ भाऊ–बहिणींच्या प्र...
रक्षाबंधन निमित्त ‘खाकी हीच राखी’चा अनोखा संदेश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रक्षाबंधन सण हा केवळ भाऊ–बहिणींच्या प्रेमाचा बंध नव्हे, तर समाजरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्यांशीही एक अदृश्य नातं जोडणारा आहे, असा भावपूर्ण संदेश अकोला येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये यांनी दिला आहे.
“खाकी हीच राखी, बांधली नाही तरी संरक्षण करणाऱ्याच” या अर्थपूर्ण घोषवाक्यातून त्यांनी समाजाला एक हृदयस्पर्शी साद घातली. पोलिसांचे बोधवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” – म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश – याची आठवण करून देत, म्हसाये यांनी अधोरेखित केले की, पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी २४ तास, अखंडपणे तत्पर असते.
या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे कृतज्ञता व्यक्त करत, रक्षाबंधनाचा बंध हा फक्त घरापुरता मर्यादित नसून, समाजरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘खाकी’ वर्दीधाऱ्यांशीही तितकाच घट्ट असल्याचे मत व्यक्त केले.
स्मिता म्हसाये यांच्या या अनोख्या संदेशाने रक्षाबंधन सणाला एक नवा सामाजिक आणि भावनिक अर्थ प्राप्त झाला आहे.

No comments