adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महागड्या चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

 महागड्या चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यान...

 महागड्या चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१९):- तब्बल 1 लाख 40,000/- रुपये किमतीच्या महागड्या  04 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पथकाने शहरातील यापुर्वी वाहन चोरी झालेल्या घटनाठिकाणी भेटी देवुन अशाप्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करत असताना दि.19 ऑगस्ट 2025 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरीता राधाबाई काळे महाविद्यालय परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पथक बातमीतील ठिकाणी सापळा रचुन थांबले असता एक संशयीत इसम विनानंबरचे मोटारसायकलवर येतांना दिसला.सदर इसमास थांबवुन त्याचेकडील वाहनाबाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सुनिल उर्फ बबलु दत्तात्रय आजबे (वय 29 वर्षे,रा.प्रेमदान हाडको,सावेडी,अहिल्यानगर, मुळ रा.देवटाकळी,ता.शेवगांव, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपीस त्याने आणखी इतर काही मोटारसायकल चोरी केलेल्या आहेत काय याबाबत तपास करता त्याने त्याचा साथीदार हनुमंत उर्फ सचिन अंकुश झाडे (रा.सामनगांव, ता. शेवगांव,जि. अहिल्यानगर(फरार)) याचे मदतीने मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले असुन ताब्यातील आरोपीचे कब्जातुन 1,40,000/- रुपये किमतीच्या खालील 04 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.ताब्यातील आरोपीस तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख,राहुल द्वारके, फुरकान शेख,प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे,सतिष भवर, प्रशांत राठोड,अरुण मोरे यांनी केलेली आहे.

No comments