कुऱ्हाडीने वार करुन पत्नीने केली पतीची हत्या: महीला अटकेत निंभोरा येथील धक्कादायक घटना रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत ...
कुऱ्हाडीने वार करुन पत्नीने केली पतीची हत्या: महीला अटकेत
निंभोरा येथील धक्कादायक घटना
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा बु.येथील गणेश कॉलनीतील रहिवासी मयत हुसेन रसूल तडवी (62) हे पत्नी हाजराबाई हुसेन तडवी (55) सोबत निंभोऱा येथे नोकरीनिमित्त ( सेवानिवृत्त शिपाई) वास्तव्याला होते. या तडवी दाम्पत्याला दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे मात्र दाम्पत्यात सततचे वाद होत असल्याने शनिवारी पुन्हा वादामुळे संशयीत आरोपी हाजराबाईने वादाच्या दरम्यान घरातील लाकडी दांडा असलेल्या कुऱ्हाडीने हुसेन तडवी यांच्या मानेवर व डोक्यावर
कुऱ्हाडीने वार केले त्यात त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटना दि.३०/८/२०२५रोजीरात्री १०वाजेपुर्वी घडली असल्याची माहिती निंभोरा पोलीसांना समजली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे उपनिरीक्षक अभय ढाकणे महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला याप्रकरणी पो ना अविनाश उत्तम पाटील १०८३, नेमणूक निंभोरा पोलीस स्टेशन.यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महीला हाजराबाई हुसेन तडवी यांच्या विरुद्ध निंभोरा पोलीस स्थानकात भाग-५ गुरनं १५८/२०२५ भारतीय न्यास संहिता कलम १०३ (१) स्टे.डा.नोंद ४/२५ वेळ ०२.५५ वा याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला हाजराबाई हुसेन तडवी हिस अटक करण्यात आली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते जळगांव, फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण बडगुजर सपोनि हरिदास बोचरे दाखल झाले होते सदर घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,डिवाय एसपी अरुण बडगुजर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे हे करीत आहेत.मयत हुसेन तडवी यांचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले शोकाकुल वातावरणात कुंभारखेडा तालुका रावेर या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
No comments