जागतिक आदिवासी दिनानिमित्त नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबीर तडवी फैजपूरीयन्स ग्रुप,कांताई नेत्रालयाचा संयुक्त उपक्रम रावेर प्रतिनिधी मुबा...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबीर
तडवी फैजपूरीयन्स ग्रुप,कांताई नेत्रालयाचा संयुक्त उपक्रम
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी फैजपूरीयन्स, फैजपूर आणि कांताई नेत्रालय आय केअर फाॅर यू सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने.
मोतीबिंदू नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
शिबिराचे वैशिष्ट्ये- मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे मोफत जाणे-येण्याची सुविधा, ८० बेडची प्रशस्त व्यवस्था, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मशिनच्या सहाय्याने फेको पद्धतीने ५३००₹ पासून. सोबत: आधारकार्ड व रेशनकार्ड आणावे.
टिप: मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची असल्यास आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत आणावे तसेच हा संदेश आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार व गरजू व्यक्तींपर्यंत पोहचावा.
शिबिराचे ठिकाण: धनश्री टाॅकिज, आदिवासी दिन उत्सव समीती सांस्कृतिक कार्यक्रम ठिकाणी यावल. दिनांक: ०९/०८/२०२५ वार: शनिवार वेळ: सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी संपर्क:- आसीफ आमद तडवी: 99754 18084, मोहसीम नजीर तडवी: 98906 21508, जावेद सुलेमान तडवी: 86985 56675, सलाउद्दीन मुबारक तडवी: 86002 19792, दस्तगीर अजित तडवी: 91720 61511 विनित तडवी फैजपूरीयन्स, फैजपूर.

No comments