डॉ.चंद्रकांत बारेला,यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षासाठी आदिवासी सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती चोपडा प्...
डॉ.चंद्रकांत बारेला,यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षासाठी आदिवासी सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षासाठी आदिवासी सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांना या आशयाचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे तरी दिलेल्या नियुक्ती पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठीसाठी आजपर्यत आपण दिलेले योगदान लक्षात घेता आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी आदिवासी सेलच्या प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय,धोरणे तसेच लोकपिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व तसेच प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांचे आदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे

No comments