adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भांडी वाटपाच्या योजनेत गोंधळ महिलांनी केला टी पॉईंट वर रस्ता रोको

 भांडी वाटपाच्या योजनेत गोंधळ महिलांनी केला टी पॉईंट वर रस्ता रोको   महिलांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास संबंधित अधिकाऱ्यांशी वार्तालाप ...

 भांडी वाटपाच्या योजनेत गोंधळ महिलांनी केला टी पॉईंट वर रस्ता रोको  

महिलांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास संबंधित अधिकाऱ्यांशी वार्तालाप करताना यावंल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सोबत पोलीस निरीक्षक धारबडे साहेब

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आज यावल येथे गृहपयोगी संच/भांडे वाटप करण्यात येतील असे सांगून लाभार्थी कामगार पुरुष व महिला यांना कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे उपस्थीत राहण्यात यावे असे पत्र देऊन अवगत केले होते... सकाळी चार वाजेपासुन कामगार महिला व पुरुष बाजार समिती यावल येथे बसून होते मात्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत न फिरकल्याने संतप्त लाभार्थ्यांनी भुसावळ चौफुली येथे रस्ता अडवून ठिय्या आंदोलनं केले... या आंदोलनात यावल येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सहभागी होऊन तहसीलदार यावल यांना भ्रमणध्वनी वरून माहिती देऊन आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्यावी अशी मागणी केली... सरकारी योजना राबविणारी यंत्रणा अकार्यक्षम असल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला असून काही दलाल या योजनेसाठी लाभार्थीकडून 500 ते 1000 रु घेऊन लूट करत आहे असे लाभार्थ्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आले.... या योजनेचा लाभ कामगार बांधवांना पुन्ह पुन्हा KYC न मागता ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावा व ही आमची मागणी तहसीलदार यावल यांनी कामगार कल्याणकारी मंडळ यांना कळवून सुलभ रीत्या भांडे वाटप करण्यात यावे अन्यथा या पेक्षा मोठे आंदोलनं केले जाईल असा इशारा दिला आहे.

No comments