adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिक पाहणी ॲप सुरळीत होऊन शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळणेबाबत शेतकरी संघटना कडून पारोळा तहसीलदारांना निवेदन

 पिक पाहणी ॲप सुरळीत होऊन शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळणेबाबत  शेतकरी संघटना कडून पारोळा तहसीलदारांना निवेदन   विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेम...

 पिक पाहणी ॲप सुरळीत होऊन शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळणेबाबत 

शेतकरी संघटना कडून पारोळा तहसीलदारांना निवेदन  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव पारोळा : सन 2025 या खरीप हंगामासाठी नवीन वर्जन शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक पेरा स्वतः लावण्यासाठी खूपच कसरत घ्यावी लागत आहे, दिवसा व रात्री शेतकरी आपल्या शेतात पिक पेरा लावण्यासाठी चकरा मारताना मेट कुडीस आलेले आहेत,,

  शेतकऱ्यांना उपलब्ध केलेले ॲप काही दिवस व्यवस्थित रित्या सुरू होते परंतु काही दिवसांनी अजून शेतकऱ्यांना पिक पेरा लावताना खूपच अडचणी येऊन शेतकरी परत घरचा रस्ता म्हणून घरी जाताना दिसत आहे व्हाट्सअप फेसबुक, फ्लिपकार्ट ॲमेझॉन, रमी खेळ सारखे ॲप ताबडतोब उपलब्ध न सांगता सुरळीतपणे असे ॲप चालतात परंतु शेतकऱ्यांच्या दरवर्षी हे ॲप माथी मारल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी हा कोणी इंजिनियर नसून तो एक साधारण कमी शिक्षण घेतलेला किंवा एखाद दुसरा बऱ्यापैकी शिक्षण घेतलेला शेवटी शेतकरीच असतो शेतकऱ्याला कोणतेही ट्रेनिंग न देता त्याला ॲप चा वापर कसा करावा हे ज्ञात नसते तरी तो प्रयत्न करून दरवर्षी पिक पेरा लावण्यासाठी सजग असतो परंतु हे ॲप ज्यांनी शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलेले असून आमचा शेतकरी संघटनेतर्फे त्यांचावर आरोप असून त्यांनी सुधारित व साध्या पद्धतीने ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे     

              असे आशयाचे निवेदन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदार , उल्हास देवरे यांना देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष प्राध्यापक भिकनराव पाटील उपाध्यक्ष अनिल पाटील अक्षय पाटील इत्यादी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते

No comments