ट्रक मधुन सबमर्सीवल मोटारपंप व सोलर पंप चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडुन जेरबंद जळगांव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ए...
ट्रक मधुन सबमर्सीवल मोटारपंप व सोलर पंप चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडुन जेरबंद
जळगांव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल पोलीस स्टेशन येथे दिनांक ३१/०५/२०२५ रोजी सी.सी.टी.एन.एस. गु.र.न ९३/२०२५ बी.एन.एस.कलम-३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयात २,३५,०००/- रु किमतीचे सवमर्सीवल पंप,सोलर पंप चोरीस गेले होते.सदरचा गुन्हा हा उमरदे ता.एरंडोल यागावा जवळ रोडवर घडलेला असुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी आदेशीत करुन पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे,पोहेक संदीप पाटील,पोहेकॉ हरीलाल पाटील,पोहेकॉ प्रविण मांडोळे,पोकॉ राहुल कोळी,चपोहेकों दिपक चौधरी याचे पथक तयार करणयात आले होते.सदरचा गुन्हाचा समांतर तपासा दरम्यान गोपनिय वातमी व तांत्रीक माहीती वरुन गुन्हा उघडकीस आणुन त्यात आकाश लालचंद मोरे रा.मुगपाठ (पदमालय) ता.एरंडोल जि.जळगांव याने त्याचे साथीदारसह सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यावरुन दिनांक २५/०८/२०२५ रोजी आरोपी आकाश यास नागदुली गावाजवळील पदमालय फाटा येथुन ताब्यात घेऊन त्यास कैशल्यपुर्वक विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा हा भरत वावुराव बागुल,पृथ्वीराज रतीलाल पाटील,पंकज रवि बागुल याचे सोबत केल्याची कबुली दिली आहे.त्यावरुन आरोपी क्र.१)आकाश मोरे वय २३ रा.मुगपाठ (पदमालय) ता.एरंडोल जि.जळगांव २)भरत वागुल वय ३२ रा.केवडीपुरा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव,पृथ्वीराज पाटील वय- २० रा.वरखेडी ता.एरंडोल जि.जळगांव यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी एरंडोल पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी,उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते,याच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप पाटील,पो.उपनि जितेंद्र वल्टे,पोहेक संदीप पाटील,पोहेकॉ हरीलाल पाटील,पोहेकॉ प्रविण मांडोळे,पोकॉ राहुल कोळी,चपोहेको दिपक चौधरी अशानी केली आहे.

No comments