पातरखेडे येथील आश्रम शाळेतील सर्व मुले बरी होऊन परतली एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील आ...
पातरखेडे येथील आश्रम शाळेतील सर्व मुले बरी होऊन परतली
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक २४ जुलै २०२५ रोजी गोवर सदृश्य आजाराची लागण झाल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच सर्व विद्यार्थ्यांना ग्रामिण रुग्णालय एरंडोल येथे आश्रमशाळेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने दाखल केले होते.वैद्यकिय पथकाने तातडीने उपचार सुरु करुन गंभीर स्वरुपाची गोवर आजारीची लक्षणे दिसुन येत असलेल्या काहि विद्यार्थ्यांना शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जळगाव येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले होते.
सर्व विद्यार्थ्यांना उपचाराअंती प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले असुन नवीन गोवर सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची एकही नोंद झाली नाही तसेच कुठल्याही विद्यार्थ्यास व्हॅन्टीलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आश्रमशाळेला भेट दिली असता गोवर आजाराची साखळी खंडीत करता यावी आणखी फैलाव होवु नये याकरिता प्रकृती ठिक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांसोबत तूर्तास घरी सोडण्याच्या मौखिक सूचना दिल्याने विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे. ग्रामिण रुग्णालय एरंडोल व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जळगाव येथे आजारी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी अहोरात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी आपली सेवा बजावली असुन आजारी विद्यार्थ्यांना दुध, फळे, नास्ता व जेवणाची संपुर्ण व्यवस्था संस्थेचे सचिव विजय पाटिल यांनी स्वतः लक्ष घालुन केली होती व त्यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतल्याने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आश्रमशाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी लवकरच पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार असुन पालकांमध्ये असलेला गोवर आजाराविषयीचा गैरसमज दूर केला जाईल व विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत हजर केले जाईल विद्यार्थी आश्रमशाळेत उपस्थित होताच वैद्यकिय पथकांचे सल्ल्याने आश्रमशाळेत गोवर लसीकरण राबविण्यासोबतच विद्यार्थ्यांची नियमित तपासणी केली जाणार असल्याचे सचिव विजय पाटील यांनी सांगितले.

No comments