adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किसान महाविद्यालयात आभासी प्रणालीद्वारे व्हेगन जीवनशैलीबाबत जनजागृती

 किसान महाविद्यालयात आभासी प्रणालीद्वारे व्हेगन जीवनशैलीबाबत जनजागृती  पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महाव...

 किसान महाविद्यालयात आभासी प्रणालीद्वारे व्हेगन जीवनशैलीबाबत जनजागृती 



पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा येथील किसान महाविद्यालयात दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, कबचौउमवि जळगाव येथी एनएसएस विभाग आणि व्हेगन आऊटरिच, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शाकाहार जीवनशैलीबाबत जाणीवजागृती करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी आभासी प्रणालीद्वारा बेबिनारचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून कबचौउमवि जळगाव विद्यापीठातील एनएसएस विभागाचे संचालक डॉ.सचिन नांद्रे आणि उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हेगन आऊटरिच संस्थेच्या समन्वयीका सारणी भट्टाचार्या होत्या. प्रास्ताविक मांडणी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी केले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना सरानी भट्टाचार्य यांनी दहाहजार वर्षापूर्वीचे आणि आताचे जंगली प्राणी आणि मानव यांच्या संख्येतील शेकडा प्रमाण, शाकाहार आणि मांसाहार यांच्यातील फरक, संतुलित आहार, शाकाहार आणि मांसाहार अन्न शिजवतांना लागणारा तुलनात्मक खर्च आणि पाण्याचा वापर, पचनास लागणारा तुलनात्मक वेळ, संकरित अन्नाचे प्रादुर्भाव, स्निग्ध पदार्थाचे अतिसेवनाचे परीणाम, प्राणिमात्रांबाबत मानवतावादी दृष्टिकोन यावर विद्यार्थ्यांशी द्वीमार्गी संवाद साधला. व्हेगन जीवनशैलीनुसार व्हेगन असणं म्हणजे फक्त काहीतरी वेगळं करणं नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी, प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि आपल्या ग्रहाच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत डॉ. सचिन नांद्रे यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील यांनी आभासी प्रणालीद्वारा सरानी भट्टाचार्य मॅडमांनी दिलेली माहीती ही विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भुमिका बजावेल असा आशावाद व्यक्त केला. प्रा. प्रमोद चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सुत्रसंचालन महीला कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. सविता चौधरी यांनी तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी मांडलेत.

No comments