विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी केले जेरबंद चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक महेश टा...
विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी केले जेरबंद
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक महेश टाक आल्यापासून गुन्हेगारावर कारवाईचे सत्र सुरूच
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत दि.२४/०८/२०२५ रोजी वैजापूर गावाकडून दोन इसम हे पल्सर मोटार सायकलने अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व काडतूस घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर इसमांवर छापा टाकून कारवाई करणेकामी मिळालेल्या बातमी प्रमाणेबोरअंजटी ता चोपडा शिवारातील वनविभाग नाक्यासमोर रोडवर पोलीस स्टाफ नाकाबंदी करून वाहन चेक करीत असताना दि.२४/०८/२०२५ रोजी १०.०३ वा चे सुमारास एका काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकलवरून दोन इसम आले तेव्हा पोलीसांनी त्यांना थांबविले व पल्सर मोटार सायकलवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जयेश धापटे वय २२ वर्ष रा.सहजीवननगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे व पाठीमागे बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव फत्तेसिग भादा वय २० वर्षे रा.दंडेवाले बाबा नगर मोहाडी ता.जि.धुळे असे असल्याचे सांगितले.त्यानंतर सदर दोन्ही इसमांना मोटार सायकलवरून खाली उतरवून मो सा चालक जयेश सुरेश धापटे याची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे उजवे बाजूचे कमरेस पाठीमागे आतुन एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा(पिस्टल)तसेच उजवे बाजूचे खिशात जिवंत काडतूस मिळून आले.तसेच मोटार सायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे उजवे बाजूस कमरेस पाठीमागे एक गावठी बनावटी गावठी कट्टा (पिस्टल) मिळून आला,त्यावेळी त्यांच्या ताब्यातील एक बजाज कंपनीची पल्सर सायकल बिना नंबर प्लेट असलेली,०१ विवो,०१ ओपो कंपनीचे ०२ मोबाईल हेण्डसेट ०२ गावठी कट्टे व जिवंत काडतुस असा एकूण १५१,०००/-रूपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आला सदर गावठी कट्टे मिळून आल्याने पो कॉ तिरूपती खांडेकर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७/२५,म.पो.अॅक्ट कलम ३७ (१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
दि.२५/०८/२०२४ रोजी आरोपी जयेश सुरेश धापटे वय २२ वर्षे रा.सहजीवननगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे,फत्तेसिंग मिलनसिंग भादा वय २० वर्षे रा.दंडेवाले बाबा नगर मोहाडो ता.जि.धुळे यांना दि.२५/०८/२०२५ रोजी ०९.४२ वाजता अटक करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई हि पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी जळगांव,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक,सफौ राजू महाजन,पोहेकाँ राकेश पाटील,पोकाँ विनोद पवार,पोकाँ विठ्ठल पाटील,चालक पोकाँ वसंत कोळी यांनी केली आहे.

No comments