सतपंथ कला केंद्र व कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे स्मृती चषक व ग्लोरीयास डान्सिंग क्लास निमित्त बालकला महोत्सव जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध...
सतपंथ कला केंद्र व कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे स्मृती चषक व ग्लोरीयास डान्सिंग क्लास निमित्त बालकला महोत्सव जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संपन्न
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
- सतपंथ कला केंद्र . व कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे स्मृती चषक व ग्लोरीयस डान्सिंग क्लास यांच्या निमित्त बाल कला महोत्सव येथील जे. टी महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे उत्साहात साजरा करण्यात आला . यावल - रावेर तालुक्यातील एकूण 18 शाळांचे 800 च्या वर विद्यार्थी सहभागी होते . यात चित्रकला, रांगोळी , सोलो डान्स, ग्रूप डान्स अशा विविध स्पर्धा दि.23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला. यात सर्वसाधारण विजेते पद जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल फैजपूर ला मिळाले तर उपविजेते पद जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल यावल यांना मिळाले ... स्पर्धेला अध्यक्ष म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी भूषविले तर कार्यकमाचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांनी केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन ,डॉ. अभय रावते ( यावल ), डॉ अमित हिवराळे (फैजपूर ) व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते तर परीक्षक म्हणून प्रसाद देसाई, होते यावेळी सचिन भिडे, संकेत वारुळकर, वैशाली गुरव , युवराज लोधी ,आदी उपस्थित होते . तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर महाले , प्रतिक काळे, प्रिया जाधव सूरज भालेराव बबलू सुरवाडे यांनी परिश्रम घेतले

No comments