adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री क्लासेस संचलित शितल अकॅडमी माळी वाडा एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 श्री क्लासेस संचलित शितल अकॅडमी माळी वाडा एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेम...

 श्री क्लासेस संचलित शितल अकॅडमी माळी वाडा एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल  – येथील शितल अकॅडमी, माळी वाडा येथे शुक्रवार व शनिवार रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.


या उपक्रमात स्थानिक  टीमने  रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, बीएमआय, ईसीजी अशा विविध तपासण्या केल्या. विशेषतः महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वेगळ अस आरोग्य सल्ला सत्र आयोजित करण्यात आले होते शितल अकॅडमीचे संचालक श्री.योगेश महाजन सर यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, "आरोग्य ही खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक आरोग्य टिकवणे हे आमचे उद्दिष्ट आहे." कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांना आरोग्य सल्ला पुस्तिका आणि आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. शैक्षिणक वर्षात  असे अनेक समाज उपयोगी असे उपक्रम राबविण्यात येतात.

No comments