रक्तदान केल्याने आपले आरोग्य अधिक सुदृढ होते -:- बीके राजश्री यावल केंद्र संचालिका दादी प्रकाशमणी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान ...
रक्तदान केल्याने आपले आरोग्य अधिक सुदृढ होते -:- बीके राजश्री यावल केंद्र संचालिका
दादी प्रकाशमणी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावल सेवा केंद्र तर्फेदादी प्रकाश मनी यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त विश्वबंधुता सप्ताहाचे आयोजन भारतासह अन्य देशांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन दिनांक 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान करण्यात येत आहे ब्रह्मकुमारी सेवा केंद्र यावल तर्फे दिनांक 23 ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळीसेवा केंद्राच्या संचालिका बीके राजश्री दीदी यांनी दादी प्रकाशमणी यांच्या जीवनाविषयी महत्त्व सांगताना कधी प्रकाशमणी या मुख्य प्रशासिका होत्या त्यावेळी त्यांनी 64 देशांमध्ये प्रवास करून सेवा केंद्र सुरू केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये विविध सामाजिक कार्य सुरू करून समाजसेवा मोठ्या प्रमाणात त्याद्वारे केले यासाठी समाजसेवा विभागातर्फे व त्यांचा कार्यक्रम हा करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करून वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड केले जाणार आहे तरी प्रकाशमणी यांचे जीवन अतिशय साधे सादगीने भरलेले होते त्या समाजप्रिय झालेल्या आहेत त्यांच्या या पुण्यतिथी निमित्ताने लाखाच्या वर रक्त संकलन केले
जाणार असून गिनीज बुकात याबाबत नोंद केली जाणार आहे . शिबिराचे आयोजना चे समन्वयक म्हणून भुसावळ येथील भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील सर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून दादीप्रकाशमणी यांच्या अठराव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आम्ही रक्तदान केले याची कायम आठवण राहावी म्हणून प्रत्येक रक्तदात्याला वृक्षाचे रोप भेट देण्यात आले . इंडियन रेडक्रॉस संस्थेचे डॉक्टर सोनवणे यांनी ही रेड क्रॉस संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देऊन रक्त दात्याला रेड क्रॉस संस्थेतर्फे दिले जाणाऱ्या योजनेबाबत माहिती दिली . जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या कार्याचे विशेष कौतुक केले खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्वाची शिकवण या संस्थेच्या मार्फत दिली जात असते असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले .
या कार्यक्रमात यावल येथील ज जि म शि प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय यावल चे उपप्राचार्य खैरनार सर यांनीही मनोगत व्यक्त केले . महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या सोनवणे यांचे सहकार्य लाभले शिवसेनेचे पंकज बारी अमोल भिरूड यांनीही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून रक्तदानाबद्दल सहकार्य केले .यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल भिरूड यांचा वाढदिवसाचे निमित्ताने त्यांनी रक्तदान देऊन व केक कापून वाढदिवस साजरी केला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या रक्तदान शिबिरात एकूण 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भावना बारी यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन नाना पाटील सर भुसावळ यांनी केले या कार्यक्रमाला सहकार्य संजू जोगी,चेतन बारी ,निवृती पाटील ,विजय बारी, रागिनी चोपडे रत्ना शिंदे ,केसर सुर्यवंशी, संदीप यादव, संदीप सोनवणे ,संजय भाई ,. प्रा पावरा सर ,प्रा इमरान सर यांच्यासह इतर सेवा केंद्राच्या बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले . इंडियन रेड क्रॉस जळगाव शाखा च्या वतीने रक्त संकलन साठी सर्व टीमने सहकार्य केले .


No comments