चोपडा येथे शहीद डॉ. नरेंद्र. दाभोळकर अभिवादन व स्मृतिनिर्धार सभा संपन्न... चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र अंनिस शा...
चोपडा येथे शहीद डॉ. नरेंद्र. दाभोळकर अभिवादन व स्मृतिनिर्धार सभा संपन्न...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र अंनिस शाखा चोपडा तर्फे हरताळकर हॉस्पिटल येथे डॉ. विकास हरताळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 12 व्या स्म्रुतिदिनानिमित् निर्धार व अभिवादन सभा घेण्यात आली.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर यांनी डॉ. दाभोळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अंनिस कार्यकर्त्यांच्या पुस्तके देवून सत्कार केला. कार्यक्रमाची सुरवात डॉ. अय्युब. आर पिंजारी यांनी तांब्यातुन तिर्थाचे पाणी वाटून चमत्कार दाखवून केली, यावेळी आठवणीतील डॉ. दाभोळकर व माझी अंनिस बद्दलची भुमिका याविषयावर डॉ. सचिन काटे, डॉ. अय्युब. आर. पिंजारी, डॉ. संदीप काळे व संजय पिरा अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षिय मनोगतात डॉ. विकास हरताळकर यांचा विविध आठवणीं व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत केलेल्या कामाबद्दल माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अय्युब. आर. पिंजारी यांनी व आभार संजय पिरा अहिरे यांनी केले.
शेवटी शाहु, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, विवेकाचा आवाज बुलंद करु या !, लढेंगे.. जिंतेंगे व शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर अशा विविध घोषणा देवून. व हम होंगे कामयाब एक दिन या गिताने कार्यक्रमाची समाप्ति करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अय्युब. आर. पिंजारी यांनी व आभार संजय पिरा अहिरे यांनी केले.
शेवटी शाहु, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, विवेकाचा आवाज बुलंद करु या !, लढेंगे.. जिंतेंगे व शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर अशा विविध घोषणा देवून. व हम होंगे कामयाब एक दिन या गिताने कार्यक्रमाची समाप्ति करण्यात आली. यावेळी. रमाकांत सोनवणे, वासुदेव भिल, अनिल वाडे, सचिन बाविस्कर, मंगेश पाटील यांचा प्रमुख उपस्थिती होती.

No comments