जि.प. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा घुस्सर बु.येथील ग्रामपंचायतींच्या वतीने मुख्ख कार्यकारी अधिकारी यांच्याकडे...
जि.प. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा घुस्सर बु.येथील ग्रामपंचायतींच्या वतीने मुख्ख कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:-- घुस्सर बु.गावामध्ये इ. १ ते ७ पर्यंत प्राथमिक शाळा असून इ १ ते ४ पर्यंत तिथं टीनपत्राच्या खोल्या आहेत तर इ ५ ते ७ व ऑफिस हे पक्क्या इमारती मध्ये आहे. सध्या ही इमारत खुप जीर्ण झाली असून त्या इमारतीचे खूप वर्षापूर्वीचे जुने बांधकाम असून, आता इमारत कधी कोसळेल सांगता येत नाही या भीतीमुळे इ. ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राणांगणात बसवावे लागत आहे किंवा एकाच वर्गामध्ये दोन-दोन वर्गातील विद्यार्थ्यांना बसवुन शिकवावे लागत आहे कारण केव्हा कधी काही दुर्घटना होईल सांगता येत नाही
त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून घुस्सर बु गावासाठी नवीन प्राथमिक शाळा इमारत उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा यासंदर्भात बुलडाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घुस्सर बु.ग्रामपंचायत वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी सरपंच श्री.भागवत मुके,उपसरपंच उमेश वानखेडे, सदस्य सुनील तायडे,सुभाष दाभाडे,तानाजी जाधव तथा गावातील नागरिक उपस्थित होते.


No comments