यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल (दि.२९) - ...
यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (दि.२९) - येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली " रसायनशास्त्रतील विविधता " या विषयावर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.पवार यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ.एच. जी.भंगाळे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार हे उपस्थित होते. तसेच गणित विषयाचे विभाग प्रमुख डॉ. एस.आर.गायकवाड हेही उपस्थिती होते.
प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत तिसरे पुष्प गुंफताना डॉ.आर.डी. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की दैनंदिन जीवनाची सुरुवात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रासायनिक पदार्थांपासून होते. या रासायनिक पदार्थांची वैज्ञानिक नावे व दैनंदिन नावे वेगवेगळी असतात. पण तेच रासायनिक पदार्थ दैनंदिन जीवनात गरजेची असतात. यात धातू,अधातू, धातुसदृश्य,आम्ल,आम्लारी आदी रासायनिक पदार्थ आहेत. आपल्या गरजा भागविण्यात हे पदार्थ विविध प्रक्रियेत उपयोगी पडतात. या पदार्थांत त्यांच्या गुणधर्मानुसार विविधता आढळते. जसे की,पाणी. हा असा पदार्थ आहे की, ज्याच्यापासून जीवन अपूर्ण आहे, म्हणूनच "पाणी हे जीवन आहे" असे म्हटले जाते. पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजन हे रासायनिक घटक असतात. प्रत्येक पदार्थांचे गुणधर्म समोरच्या पदार्थांशी प्रक्रिया होत असतांना काही गुणधर्म बदलून त्याचे रूपांतर चांगल्या पदार्थात होऊ शकते. उदा.अन्नापासून रक्त तयार होणे,अन्नापासून ऊर्जा तयार होणे वगैरे. गुणधर्म बदलतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एच.जी. भंगाळे यांनी रासायनिक पदार्थ अनमोल असतात. त्यांचे मूल्य मोजता येत नाही. निसर्गात आढळणाऱ्या घटकांपासून शेतकऱ्यांना उपयोगी अशा पदार्थांची निर्मिती होऊ शकते. टाकाऊ कुजणाऱ्या पदार्थांपासून कंपोस्ट खत, फवारणी औषध वगैरे निर्माण करता येतात. यात पिक व वनस्पतीसाठी लागणारे रासायनिक मूलद्रव्ये उपलब्ध होत असतात असे संबोधित केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.नरेंद्र पाटील यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.
No comments