adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात BDO शी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत मार्गदर्शनपर विविध व्याख्याने संपन्न

  यावल महाविद्यालयात BDO शी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत मार्गदर्शनपर विविध व्याख्याने संपन्न  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 यावल महाविद्यालयात BDO शी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत मार्गदर्शनपर विविध व्याख्याने संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल (दि.२९)- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करारांतर्गत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाला पंचायत समिती, यावल येथील विविध पदाधिकारी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित होते.यामध्ये ई. के.चौधरी (कृषि अधिकारी) यांनी शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजना आहेत. कृषी विभागात विहीर, मोटार पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सर्वांसाठी अनुदान असते. शासनाच्या एका योजनेचा लाभ घेतल्यानंतर काही विशिष्ट काळ दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही असे सांगितले. डी.सी.पाटील (आरोग्य विस्तार अधिकारी) यांनी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांना आधी आपले आरोग्य चांगले ठेवावे लागेल.आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. अगदी लहानपणापासूनच बाळाला पेंटाव्हॅलेंट, पोलिओ, बीसीजी,एमएमआर,गोवर क्रिस्टल या लसी मोफत दिल्या जातात. शासनातर्फे प्रधानमंत्री गोल्डन कार्ड योजना, मातृत्व वदंन योजना यासारख्या विविध योजना राबवल्या जातात असे सांगून या व अशा विविध योजनांची माहिती दिली. तसेच डॉ.व्ही.सी.गजरे (पशुधन विकास अधिकारी) यांनी पशुपालनासंदर्भात माहिती देतांना त्यांनी शाश्वत पशुपालनासाठी शाश्वत शेती असणे गरजेचे आहे. पशुधन शेतीचे तीन प्रकार आहेत. ते म्हणजे गाई, शेळी पालन व कुक्कुटपालन हे होय. जनावरांच्या विविध रोगांवर आपण घरगुती उपाय करू शकतो. मात्र गंभीर आजारासाठी त्यांना योग्य उपचाराची गरज असते असे सांगितले.तसेच एस.बी.तडवी (कनिष्ठ सहाय्य्क,समाज कल्याण विभाग) यांनी प.स.सेस व जि.प.सेस अशा शासनाच्या 2 योजना आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने DBT योजना सुरू केलेली आहे. शासनाकडून या योजनेसाठी जो निधी येतो तो विविध योजनांमध्ये कसा विभागला जातो याविषयी व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी माहिती दिली. तसेच कुणाल चव्हाण (स्थापत्य अभियंता) यांनी शासनाच्या सर्वच संवर्गासाठी घरकुल योजना आहेत. त्यामध्ये कोणती घरकुल योजना कोणत्या संवर्गासाठी आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. याबरोबरच सौ.सरोज पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत पाठ्यपुस्तक योजना,मोफत गणवेश योजना,अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना, विविध शिष्यवृत्ती संदर्भातील योजना याविषयी माहिती दिली.यावेळी श्री. के.डी.पाटील (पशुधन पर्यवेक्षक) तसेच सौ.मंगला सपकाळे व आशिक हुसेन खान मोहोम्मद (शिक्षण विस्तार अधिकारी,पं.स. यावल) हेही उपस्थित होते.याबरोबरच महाविद्याल्याच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी सरकार जवळ -जवळ समाजातील प्रत्येक क्षेत्रासाठी व प्रत्येक घटकासाठी योजना राबवित आहे आणि त्याचा लाभ हा विद्यार्थ्याने व समाजाने अवश्य घेतला पाहिजे असे संबोधिले.सदर कार्यक्रमात उपप्राचार्य एम.डी.खैरनार यांनी शासनाच्या कृषी विषयक योजनेमुळे  शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे,आरोग्य विषयक योजनांमुळे व्यक्तीचे आरोग्यमान वाढले आहे,सरकार विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना राबवीत आहे.कारण विद्यार्थी घडला तरच देश टिकेल असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामंजस्य करार प्रमुख, प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.इम्रान खान यांनी तर आभार प्रा. रूपाली शिरसाठ यांनी मानले. सदर कार्यक्रमाला प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. प्रशांत मोरे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments