महिला सुरक्षितता-महिला सबलीकरण आणि स्वावलंबी जीवन..... धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) इंदिरा गांधी माध्य. व क. महाविद्यालय ...
महिला सुरक्षितता-महिला सबलीकरण आणि स्वावलंबी जीवन.....
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
इंदिरा गांधी माध्य. व क. महाविद्यालय तसेच आदर्श माध्य. व उच्च माध्य. विद्यालय धरणगाव येथील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी धरणगाव येथील पोलीस उप निरीक्षक श्री. संतोष पवार साहेब यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी काय उपाय करावे तसेच गुन्हा घडणारच नाही यासाठी काय दक्षता घ्यावी, यासाठी कायदे कलम सांगत मार्गदशन केले.
समाजात महिलांबाबत असलेली असुरक्षितता लक्षात घेता मुलींनी किंवा महिलांनीच कसे सावध व्हावे... याचे मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेतून आपले भविष्य उज्ज्वल करा हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. संस्थेचे सचिव आबासाहेब श्री. सी. के. पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य. सौं. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. ए. एस. पाटील सर, वरिष्ठ शिक्षक तसेच कनिष्ठ महा. विभाग प्रमुख श्री.एस. एन. चौधरी सर व सर्व कनिष्ठ विभागाचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. पी. चौधरी सर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन श्री. पी. पी. पाटील सर यांनी केले.
संकलन : श्री.विजेंद्र पाटील सर.

No comments