सुनंदन बहुउद्देशीय संस्था आयोजित ७९ वा स्वातंत्र्य दिवसानिमित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रतिनिधी चोपडा (संपादक -:- हेमकांत ...
सुनंदन बहुउद्देशीय संस्था आयोजित ७९ वा स्वातंत्र्य दिवसानिमित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
प्रतिनिधी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुनंदन बहुउद्देशीय संस्था हातेड बु यांच्या वतीने हातेड येथिल श्री शिवाजी हायस्कूल चा दहावी व बारावीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय समितीचे चेअरमन मा. ॲड. सुरेश आनंदराव सोनवणे व मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील विविध संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते.
या सत्काराचे स्वरूप छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले रजत नाणे,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते . कै. दादासो. विशाल भागवत सोनवणे (असि मॅनेजर आयडीबीआय बँक, यावल) यांच्या संकल्पनेतून सुनंदन बहुउद्देशीय संस्था समाज उत्थानासाठी कार्यरत आहे. म्हणूनच यावर्षी गावातील शाळेमधील गुणवंत विद्यार्थी चि. सागर शिरसाट,कल्याणी शिरसाट,सायली झाल्टे,अनुष्का सनेर, तनया कोळी,कृष्णा सनेर,गौरी बाविस्कर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ह.भ.प. भागवत दौलतराव सोनवणे यांचे सर्व कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनंदन बहुउद्देशीय संस्थेची संचालक व सर्व सहकारी उपस्थित.

No comments