हॉली एंजल कॉन्व्हेंट स्कूल, यावल येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : हॉली ए...
हॉली एंजल कॉन्व्हेंट स्कूल, यावल येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : हॉली एंजल कॉन्व्हेंट स्कूल, यावल येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या व्हाईस चेअरमन मिसेस डेलफिन सबकाले व शाळेचे सचिव मिस्टर व्हिन्सेंट मथायस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रीय गीत, देशभक्तिपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश दिला.
लहान मुलांनी देशभक्तिपर कविता, नृत्य व भाषणातून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्राचार्या मिसेस एड्वीना मथायस यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यात आले व “जय हिंद” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

No comments