adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालय व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांनी राबवले रक्तदान शिबिर

  यावल महाविद्यालय व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांनी राबवले रक्तदान शिबिर  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

 यावल महाविद्यालय व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांनी राबवले रक्तदान शिबिर 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व बंधुत्व दिवस यानिमित्ताने  रक्तदान शिबिर 23 ऑगस्ट 2025 रोजी दया लक्ष्मी नगर, भुसावळ रोड यावल येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात यावल महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार,रेड क्रॉस चे मेडिकल ऑफिसर डॉ.सोनवणे व उपस्थित पाहुण्यांमध्ये शिवसेना शहर प्रमुख पंकज बारी,नाना भाई व या कार्यक्रमास विशेष भेट प्रभाकर आप्पा सोनवणे व त्यांचे चिरंजीव संदीप भाई अमोल भारुड यांनी दिली. या शिबिराचे अध्यक्ष यावल महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपल्या मार्गदर्शनातून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करायला पाहिजे. रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः मोठ्या शस्त्रक्रिया अपघात आणि प्रसूती दरम्यान रक्तशी गरज असते.रक्तदात्याला तात्पुरता थकवा येऊ शकतो. परंतु शारीरिक आरोग्य सुधारते रक्तातील लोहाच्या पातळीशी तपासणी होते.आणि हृदय व कर्करोगासारखे आजारांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावल शहरातील शिवसेनाप्रमुख यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जीवनदान, आरोग्य तपासणी, शारीरिक फायदे व रक्तदानातून नैराश्य कमी  होते.या रक्तदान शिबिरात एकूण 37 रक्तदात्यानी रक्तदान केले.व समाजापुढे एक आदर्श निर्माण केले.यावेळी यावल महाविद्यालय व प्रजापती ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्याला एक रोप देऊन स्वागत करण्यात आले.यात यावल महाविद्यालयातील विद्यार्थिनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले.या शिबिरास यावल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला व त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.यावेळी महाविद्यालयातील एन.एस.एस. विभाग प्रमुख डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.सी.टी.वसावे, प्रा.भावना बारी,प्रा.इमरान खान प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागातील विद्यार्थ्यांनी या शिबिरास विशेष सहकार्य केले.

No comments