धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत...... विज्ञान मेळाव्यात अनोरे विद्यालय तर नाट्योत्सव स्पर्धेत आदर्श विद्या...
धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत......
विज्ञान मेळाव्यात अनोरे विद्यालय तर नाट्योत्सव स्पर्धेत आदर्श विद्यालय, साकरे विद्यालय अव्वल.
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुकास्तरीय विज्ञान मेळावा स्पर्धेमध्ये अनोरे विद्यालयाचा तर विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये विभागून आदर्श विद्यालय व साकरे विद्यालयाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासंदर्भातील अधिकृत असे की २८ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सवाचा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी डॉक्टर भावना भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी के पाटील, मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैदांणे , पर्यवेक्षक ए एस पाटील , विज्ञान समन्वयक बी आर महाजन, केंद्रप्रमुख भिकन शिरसाट आधी मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही स्पर्धेत तालुक्यातील जवळपास १८ शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यात विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक : कुमारी उमा दिनकर पाटील( बी जे महाजन विद्यालय अनोरे) द्वितीय क्रमांक: श्रावणी सचिन पाटील ( सा.दा.कुडे विद्यालय, धरणगाव) तृतीय क्रमांक:जानवी सत्यजित पाटील (इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव) यांनी मिळवला आहे.
तसेच विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये विभागून दोन शाळांचा प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यात आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथील डिजिटल इंडिया तर बा.च.भाटीया माध्यमिक विद्यालय साकरे चा सर्वांसाठी स्वच्छता या नाटिकेला क्रमांक मिळवला आहे.द्वितीय क्रमांक: स.न.झंवर माध्यमिक विद्यालय पाळधी आणि तृतीय क्रमांक: इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव या शाळेने मिळवला आहे.
सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान समन्वयक बी आर महाजन यांनी विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी डॉक्टर भावना भोसले केंद्रप्रमुख भिकन शिरसाट, व्हि के मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय तज्ञ तुळशीराम सैंदाणे यांनी केले तर आभार दीपक पाटील यांनी मानलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंदिरा गांधी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद तसेच गट साधन केंद्र धरणगाव चे योगेश्वर पाटील, जयदीप पाटील आदींचे सहकार्य लाभले.
No comments