adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आई तुळजाभवानी देवस्थानाच्या प्रवेश‌द्वार तथा बाह्य भागाचे मूतनीकरण, सौदयीकरण व निर्माण कार्याचा भव्य लोकार्पण सोहळा

  आई तुळजाभवानी देवस्थानाच्या प्रवेश‌द्वार तथा बाह्य भागाचे मूतनीकरण, सौदयीकरण व निर्माण कार्याचा भव्य लोकार्पण सोहळा   नागपूर प्रतिनिधी:  (...

 आई तुळजाभवानी देवस्थानाच्या प्रवेश‌द्वार तथा बाह्य भागाचे मूतनीकरण, सौदयीकरण व निर्माण कार्याचा भव्य लोकार्पण सोहळा  


नागपूर प्रतिनिधी: 

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

नागपूर :श्री  तुळजाभवानी देवस्थान हे मार्ग क्रमांक ५. विश्वकर्मा नगर, नागपूर येथील जागृत देवस्थान आहे. देवस्थानाला ३८ वर्षे पूर्ण झाले आहेत. देवस्थाना तर्फे दरवर्षी चैत्र व शारदीय नवरात्र, श्रीराम जन्मोत्सव, श्री हनुमान जन्मोत्सव, श्रावण मासात श्री शिवा अभिषेक व शिवार्चण पूजन, गोकुळाष्टमी, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्रिपुरी पौर्णिमा हे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम हर्षोल्हासात आयोजित केले जातात. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठे करिता भव्य कार्यक्रम व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


धार्मिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक बांधिलकीतून समाजातील सर्व स्तरांवरील नागरिकां करिता नियमित विविध वैद्यकीय शिबिरे व रक्तदान शिबिरांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येते. प्रातः व संध्या पूजन, आरती तसेच भजन कीर्तन व प्रबोधनाचे कार्यक्रम देवस्थानात नियमित होत असतात देवस्थानात नागपूर व नागपूर जिल्हयातून मोठ्या प्रमाणात भक्त श्रद्धेने दर्शनाकरिता येतात. दरवर्षी ८ ते १० हजार भक्तांचा महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम शारदीय नवरात्रात सर्व भक्तांच्या सहभागाने दरवर्षी पारपडतो. मागील ३८ वर्षात समाजातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवरांनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता देवस्थानामध्ये हजेरी लावलेली आहे. वर्ष २०२५ मध्ये देवस्थानाच्या बाह्यभाग व प्रवेश‌द्वाराचे नूतनीकरण व सौंदर्यकरण कार्य दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. मोहनभाऊ मते यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेले आहे. तुळजापूरच्या धरतीवर शिवकालीन स्थापत्याच्या साजाने देवस्थानाच्या दर्शनीय भागाचे निर्माण कार्य झाले आहे. भक्तांतर्फे या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. या निर्माण कार्याचा भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते होणार आहे. लोकार्पणाच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून दिनांक ०१-०८-२०२५ ते ०३-०८-२०२५ या तीन दिवसात देवस्थानाच्या सभामंडपामध्ये श्री. नवचंडी महायज्ञाचे आयोजन भक्तीभावाने करण्यात आलेले आहे. या यज्ञाकरिता माननीय आमदार श्री मोहन भाऊ मते सपत्नीक नियमित उपस्थित होत आहेत. देवस्थानाचे नूतनीकरण व निर्माण कार्य प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. दिलीप कोमेजवार व निर्माण कार्य सिव्हिल इंजिनियर श्री. काशिनाथ इंटनकर यांचे मार्गदर्शनात पारपडले. रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अभिजीत मुहूर्तावर श्री. नवचंडी महायज्ञाची पूर्णाहुती, महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की हेच निमंत्रण समजून त्यांनी या सर्व सोहळ्यास उपस्थित राहावे व आई तुळजाभवानीचे दर्शन व कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा. देवस्थानाचे सर्व विश्वस्त व ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते कार्य सिद्धीस नेण्याकरिता अहोरात्र मेहनत घेत आहेत.

श्री माँ तुळजाभाना देवस्थान पंचकमेटी

विनीत, श्री. मा तुळजाभवानी देवस्थान मंदिर पंच कमिटी, भार्ग क्रमांक ५, विश्वकर्मा नगर, नागपूर- २७

No comments