मुलुख मैदान तोफ साथी गुलाबराव पाटील यांना विनम्र अभिवादन शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन. अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
मुलुख मैदान तोफ साथी गुलाबराव पाटील यांना विनम्र अभिवादन शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन.
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी साने गुरुजी नूतन माध्यमिक आणि कन्या हायस्कूल अमळनेर येथील विद्यार्थ्यांची शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात नूतन माध्यमिक विद्यालयाचे १९ विद्यार्थी आणि कन्या हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्याथींनी सहभाग नोंदविला हा कार्यक्रम विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा आणि माजी आमदार कै. साथी गुलाबराव पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा शालेय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आयोजित करण्यात आला होता यात कार्यक्रमाचे अध्यक्ष , अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय संदीप घोरपडे सर यांनी कै. बापूंच्या जीवन शैलीवर आणि त्यांचे आचरण, स्पष्ट वक्तेपणा आणि राजकीय जीवनावर प्रकाश टाकला शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी बापूंच्या जीवनावर परखडपणे मत मांडून बापूंचा जीवनपट उलगडला. प्रास्ताविक मुख्या. सुनील पाटील तर मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मार्गदर्शन केले
प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, रोख बक्षिसे देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंमळनेर शहराचे सुप्रसिद्ध तबलावादक योगेश संदानशिव, संस्थेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गुणवंत पाटील. शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी सर आणि परीक्षक म्हणून लाभलेले मनीष उघडे सर आणि बापूराव पाटील (ठाकरे ) सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि. ए. धनगर सर आणि आर. एम .देशमुख सर यांनी केले तर मुकेश पाटील यांनी आभार मानले.

No comments