ब्रह्माकुमारीज महारक्तदान महाअभियानातून गिनीज बुकमध्ये नोंद देशभरात एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प – सहा हजार सेवाकेंद्रांत भव्य रक्तदान शि...
ब्रह्माकुमारीज महारक्तदान महाअभियानातून गिनीज बुकमध्ये नोंद
देशभरात एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प – सहा हजार सेवाकेंद्रांत भव्य रक्तदान शिबिरे
चोपडा ओम शांती केंद्रात २५ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबीर .
चोपडा (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या महारक्तदान महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला.
या उपक्रमांतर्गत भारत व नेपाळ भरातील सहा हजार सेवाकेंद्रांवर २२ ते २५ ऑगस्टदरम्यान रक्तदान शिबिरे होणार असून, तब्बल एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. या विक्रमी उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.
अभियानासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जिल्हा रक्तपेढी, सरकारी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच रोटरी व लायन्स क्लबचे सहकार्य मिळत आहे. शिबिरांचे गुगल मॅपद्वारे थेट मॉनिटरिंग केले जात असून, संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात संकलित केला जात आहे.
दरम्यान, चोपडा ओम शांती केंद्र, प्रभू चिंतन भवन येथे दि. २५ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ असल्याची माहिती सेवाकेंद्र संचालिका ब्रम्हाकुमारीज मंगला दीदी यांनी सांगितले. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे..
आध्यात्मिकता व मानवतेचा संगम – ब्रह्माकुमारीज महारक्तदान महाअभियान!

No comments