adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लाडक्या बहिणी आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविणार दहा हजार राख्या - योगेश महाजन

 लाडक्या बहिणी आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविणार दहा हजार राख्या - योगेश महाजन  प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी  (संपादक...

 लाडक्या बहिणी आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविणार दहा हजार राख्या - योगेश महाजन 


प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल येथे शासकीय विश्राम गृह येथे भारतीय जनता पार्टी एरंडोल शहर विखरण रिंगणगाव मंडळाची बैठक पार पडली.अध्यक्ष स्थानावरून बोलतांना मंडळ अध्यक्ष योगेश  महाजन यांनी बैठकीमध्ये रक्षाबंधनानिमित्त मंडळातून लाडक्या बहिणींकडून आपला लाडका भाऊ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच हर घर तिरंगा, तिरंगा रॅली व विभाजन विभिषिका अशा विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात देखील सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती तर सूत्रसंचलन सरचिटणीस अमरजितसिंग पाटील यांनी केले. 

     याप्रसंगी भिका कोळी, निलेश परदेशी, नाना देसले, संजय जाधव, भगवान मराठे, मोहन चव्हाण, किशोर पाटील, राहुल बडगुजर, किरण नन्नवरे, नितीन महाजन, सचिन विसपुते, अजित पाटील, रवींद्र महाजन, शेख अकील जयरोद्दीन, संदीप बोडरे, प्रमोद महाजन, मोतीलाल पाटील, अजय भोई, शामकांत बोरसे, रितेश परदेशी, वीरेंद्र दुबे, अविनाश सोनवणे, निखिल सूर्यवंशी, प्रकाश महाले,  सतीश महाजन, मयूर ठाकूर, नितीन वाघ, राहुल महाजन, कुलदीप सूर्यवंशी, रवींद्र भोई, सौ ज्योती वाणी, सौ ज्योती धनगर व  भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व असंख्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments